उन जरा जास्त आहे...दर वर्षी वाटतभर उन्हात पाऊस घेऊन...आभाळ मनात दाटतेतरी पावले चालत राहतात...मन चालत नाहीघामा शिवाय शरीरात...कोणीच बोलत नाहीतितक्यात कुठून एक ढ़ग सुर्यासमोर येतोतितक्यात कुठून एक ढ़ग सुर्यासमोर येतोउन्हा मधला काही भाग पंखांखाली घेतोवारा उनाड़ मूला सारखा सैरा वैरा पळत रहातोपाना फूला झाडांवरती छ्परावरती चढूंन पाहतोदूपार टळून संध्याकाळचा सुरु होतो पुन्हा खेळउन्हा मागुं चालत येते गार गार कातरवेळचक्क डोळयां समोर रुतु कूस बदलून घेतोपावसाआधी ढ्गां मधे कुठुन गारवा येतो ...गारवा... वार्यावर भिरिभर पारवा... नवा नवा...प्रिये... नभात ही... चांदवा नवा नवा... गारवा...गवतात गाणे झूलते कधीचे...हिरवे किनारे हिरव्या नदीचे...गवतात गाणे झूलते कधीचे...हिरवे किनारे हिरव्या नदीचे...पाण्यावर सर सर सर काजवा... नवा नवा...प्रिये... मनात ही ताजवा... नवा नवा...आकाश सारे माळून तारे...आता रुपेरी झालेत वारे...आकाश सारे माळून तारे...आता रुपेरी झालेत वारे...अंगभर थर थर थर नाचवा... नवा नवा...प्रिये... तुझा जसा गोडवा... नवा नवा...